जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका युवकाने आमरण उपोषण सुरु केले आहे. या युवकाच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. हदगाव तालुक्यातील कोथळा येथील युवक समाधान वानखेडे याने हे उपोषण सुरु केले आहे. आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कोथळा येथे उपोषण करता समाधान वानखेडे या युवकाची तब्यत खालावली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपोषण सोडण्यास सांगितले. मात्र जरांगे पाटील यांचा संदेश येईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार युवकाने बोलून दाखवला