संजयनगर परिसरात आयकॅप लिकर कंपनी समोरील रोडवर, कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला . परमेश्वर बिरू बंडगर ( वय ३६ रा. पदमाळ ) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता झाला. या प्रकरणी माणिक बिरू बंडगर ( वय ३४ रा. पदमाळ ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत परमेश्वर बंडगर हे माधवनगर मधील सुवर्णा दुकानात काम करीत होते. सोमवारी रात्री ते कामानिमित्त विजयनगर कडे गेले होते. काम आटपू