फ्रँचाईजीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून ६२ लाख ८५ हजार ६९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुसऱ्या संशयिताला सचिन तुकाराम उदगांवे (वय ४५, रा.चिंचवड,ता.शिरोळ) याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात यापूर्वीच मुख्य सूत्रधार विजय नाथा जगदाळे याला जमखंडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरा संशयित सचिन उदगांवे याला शुक्रवार,दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.