मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील शिरखेड फाट्याजवळ चारगड नदीच्या पुलावर, दिनांक 28 ऑगस्टला सायंकाळी साडेसात ते आठ वाजता च्या दरम्यान दुचाकीला ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात, अष्टविनायक बँकेचे अधिकारी आशिष मधुकरराव शेरेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शिरखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करून ट्रक चालक राजेंद्र जाधव याला ट्रक सहित ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास शिरखेड पोलिसांकडून सुरू आहे