कोरेगाव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी मध्यरात्री चिमणगाव येथे भोसे रस्त्यावर असलेल्या राऊत वस्तीमध्ये चोरट्यांनी चोरी करत तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दुपारी सव्वा चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयवंत सर्जेराव राऊत हे शेतकरी असून चिमणगाव येथील रहिवासी आहेत. भोसे रस्त्यावर राऊत वस्ती येथे ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत.