मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने भडगाव शहरातील मराठा समाज व इतर समाजातील व्यक्तींनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 10:00 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव व इतर समाज बांधव एकत्र जमले आणि त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचे यावेळी दिसून आले.