लातूर-जहीराबाद महामार्गालगत असलेल्या केळगाव-लांबोटा वनउद्यान परिसरात आज संध्याकाळी सुमारे पाच वाजता काटेरी झुडपात अडकलेल्या एका जखमी मोराची पत्रकार जावेद मुजावर यांनी सुटका केली. त्यांच्या या कार्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत असून त्यांनी दाखवलेली माणुसकी सर्वांना प्रेरणादायी ठरली आहे. निलंग्यावरून केळगावकडे जात असताना मुजावर यांच्या नजरेस रस्त्यालगत झुडपात अडकलेला मोर दिसून आला.