तुमसर तालुक्यातील चुल्हाड व बपेरा परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी हंगामात धान पिकाची लागवड केली. मात्र गत महिन्यांपासून तुमसर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने कहर केला यात परिपक्व झालेले धानपिक भुईसपाट झाले तर मळणी केलेले धान्य ओलेचिंब झाले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी आज दि. 23 मे रोज शुक्रवारला सकाळी 10.30 वा.जुलाड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.