तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वनविभागाच्या जागेत प्राणीसंग्रहालय उभारले जाणार आहे.प्राणी संग्रहालयात वाघ,सिंह,जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत.प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आ.राणा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यासह पाहणी केली.पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनविभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.