भंडारा तालुक्यातील शिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय अंदाजे 35 वर्षे हा तरुण शेतकरी शिंगोरी पलाडी शेत शिवारातील नाल्यात वाहून गेल्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट रोजी घडली होती. किसन हा स्वतःच्या गाई, म्हशी व जनावरांना वाचविण्याकरता नाल्याच्या पाण्यात गेले असता तो पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. नाल्याच्या काठावर त्याचे कपडे, मोबाईल, जुते व मोटरसायकल आढळून आले होते. बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.