तुमसर तालुक्यातील स्टेशन टोली देव्हाडी येथे एका भोजनालयासमोर उभी ठेवलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना दि.27 ऑगस्ट रोज बुधवारला दुपारी 1 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी अमोल हरिभाऊ रेवाडे रा. आंबेडकर वार्ड देव्हाडी हा स्टेशनटोली येथे शिवराज भोजनालयात जेवायला आला असता त्यांनी आपली मोटरसायकल भोजनालयासमोर उभी ठेवली होती. यादरम्यान अज्ञात आरोपींनी मोटरसायकल लंपास केली. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.