तारदाळ गावासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.वाढती लोकसंख्या आणि परिसरातील वाड्यांची वाढ लक्षात घेता,मृतदेह स्मशानभूमीत नेणे हे ग्रामस्थांसाठी अडचणीचे ठरत होते.यासाठी अनेकदा खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता.