तुळजापूर तालुक्यातील धुळे - सोलापूर महामार्गावरील माळुंब्रा गावात संतप्त होत नागरिक दि.27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता रस्त्यावर उतरले.सोलार कंपनीत कामास असलेल्या एका कर्मचाऱ्याचा दि.26 एप्रिल रोजी दुपारी शॉक लागून मृत्यू झाला होता.त्याच्या कुटुंबास नुकसान भरपाई कंपनीकडून दिली जात नसल्याने हा रास्ता रोको करण्यात येत आहे. दोन्ही बाजूला गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.उत्तम वडणे राहणार माळुंब्रा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.