सेनगांव तालुक्यातील दाताडा दाताडा खुर्द येथून सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षण मोर्चा साठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे भव्य असा मोर्चा भडकणार असून या मोर्चाला हिंगोली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने सकल मराठा समाज बांधव मोर्चासाठी आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.