अकोल्याच्या तापडिया नगर येथील मराठा नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी मद्यधुंद तरुणाने फावड्याने दुकाने फोडत लोकांवर हल्ला चढवला. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलं. माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन आरोपीला अटक केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि उपद्रवाच्या निषेधार्थ आज पोलिसांनी आरोपीची धिंड काढत परिसरात भीती दूर केली. पोलिसांनी याला घटनास्थळी पंचनामा पाहणी असं संबोधलं असून अधिक तपास सुरू आहे.