वस्सा गावातील अभिषेक गजानन राऊत वय 21 वर्ष हा युवक घराजवळील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना त्याला अचानक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी विहिरीत उतरून शोध कार्य सुरू केले, दरम्यान जिंतूर अग्निशमन दल व बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतील पाणी मोटारीने बाहेर काढून तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.