स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी शहरासह जिल्ह्यात चोऱ्या करणारा कैलास विष्णू लोखंडे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सोनपेठ येथील तिरुपती मेडिकल स्टोर मध्ये चोरी केल्याची तसेच परभणीतील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले लॅपटॉप,दोन सीसीटीव्ही कॅमेरे राऊटरसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय जनसंपर्क अधिकारी यांनी आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 33 वाजता दिली आहे.