लातूर -गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भाजीपाला, फळबागा यासह उभ्या पिकात पाणी साचून शेतकऱ्यांवर मोठी संकटे ओढवली आहेत. काही ठिकाणी घरातसुद्धा पाणी शिरले..