अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बायपास रोडवर सध्या राजरोसपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. या बांधकामासाठी ग्रामपंचायत, कलेक्टर, बांधकाम विभाग यांची कोणतीही परवानगी किंवा मंजुरी घेण्यात आलेली नाही. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे लेखी तक्रार करूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य अथवा ग्रामविकास अधिकारी फिरकत नाहीत आणि या बांधकामाच्या संबंधाने कोणतीही चौकशी केली जात नाही.