पश्चिम अकोला विधानसभा क्षेत्रातील सोनटक्के प्लॉट भागात दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी आकस्मिक दौरा करताना आ. साजिद पठाण यांनी प्रचंड घाणीचे साम्राज्य पाहून स्वच्छता विभागाला चांगलीच झाडाझडती दिली. घंटागाडी आठ दिवसांतून एकदाच येते, नाल्यांत तुडुंब घाण, ठिकठिकाणी साचलेला कचरा, थातूरमातूर सफाई याबाबत नागरिकांच्या तक्रारींवरून त्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत "सर्व कर्मचारी तैनात करा, अन्यथा कंत्राट रद्द करेन," असा सज्जड दम दिला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही तातडीने काढण्याचे आदे