गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे ११ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून यामधून १ हजार ४१० क्यूमेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी व नदी काठच्या