शेतकरी नेतृत्व श्रद्धेय स्व. शरद जोशी यांच्या जयंतीदिनी मलकापूर येथे तान्हा पोळा च्या निमित्ताने आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ वाजता सर्जा राजा व उत्कृष्ट गावभूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष अमरावती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने सातबारा कोरा कोरा केलाच पाहिजे असे अमरावती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.