डोंबिवली परिसरामध्ये महिला चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. उल्हासनगर परिसरातील पश्चिमेकडील गुप्ता रोड येथे इमारतीत घुसून एका महिलेने भर दुपारी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुप्ते रोड येथील शिवस्मृती या इमारतीच्या खोलीमध्ये भर दुपारी घुसून महिलेने खोलीमध्ये असलेली कामगाराची बॅग आणि वीस हजाराची रोकड लंपास केली आहे. चोरीचा प्रकार आणि महिला चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ समोर येत आहे