आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुतांश शेतकरी हे शेती करतात, शेती करतांना शेतकऱ्यांचा सोबती म्हणजे बैल होय, श्रावणी अमावस्येला बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सन साजरा केला जातो, आज देखील नांदेड जिल्ह्यातील विविध गावात हा सन मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला आहे, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने बैलांची संख्या ही कमी झाली असली तरी हा सन मात्र वाजत गाजत सजवत साजरा करण्यात आला आहे.