कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. गोकुळने दूध संस्थाना घड्याळ आणि जाजम वाटप केले.सुमारे 3 कोटींची ही खरेदी करताना टेंडर न काढता केवळ कोटेशन मागवून घेतले.त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे.वाटप केलेले घड्याळ आणि जाजम यांची बाजारातील किंमत वेगळी आहे.आणि गोकुळने खरेदी केलेली किंमत वेगळी आहे असा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.