विटावा ब्रिज येथे रस्त्याने जात असलेल्या एका ट्रक चा लागल्याने हाईट बॅरियर रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली होती. रस्त्यावर हाईट वेरियर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हाईट बॅरियर रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.