पोलिस स्टेशन कंधार येथे दि २१ ऑगस्ट २०२५ रोजी गु.र.नं.२९३/२०२५ कलम ३१०(२) बिएनएस प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलिस पथकास आदेशीत केले असता पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून गोपनीय बातमीदार यांचे मार्फत आज सायंकाळी उपरोक्त कारवाई करत आरोपी १) आकाश राठोड २) रोहित देशमुख ३) पवन सावंत ४) शेख फेरोज ५) आकाश सावंतला अटक करून त्यांच्या कडून मुद्देमाल जप्त केला.