ल्हासुर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तक्रारदार ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली आहेत. योजनेच्या कामाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल. पूर्णपणे तपासणी केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.