साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर सायंकाळी भरधाव बसने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यात शाळकरी विद्यार्थीनी ठार झाली. तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४०/एन-९०१४ ही बस हयगयीने व भरधाव वेगात साक्री शहरातून जात होती.चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ही बस चालवली. त्यावेळी पुढे एमएच-१८/ बीवाय-५४३७ या स्कुटीवर महिला व तिची मुलगी प्रवास करत होते. अचान