काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला पुन्हा एकदा डिवचले असून वोट चोरी प्रकरणी त्यांनी थेट आरोप केले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांचे थोरात यांनी समर्थन केले आहे. महाराष्ट्रात शिर्डी विधानसभा मतदारसंघात एका हॉस्टेलमध्ये सात हजार मतदार नोंदले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. कराड दौऱ्यावर आलेल्या थोरात यांचे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी स्वागत केले.