आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दिड वाजताच्या दरम्यान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अशी माहिती दिली आहे की, काल कुबेर भंडारी गुजरात येथे जात असताना रात्री जालना येथे माझ्या इनोव्हा क्रिस्टा वाहनास अपघात झाला असून तुमच्या सर्वांच्या आणि भगवंताच्या आशीर्वादाने कोणतीही जीवितहानी व दुखापती झाली नसल्याचे म्हणत मी उद्या नांदेडला येणार असल्याचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनी आज शनिवारी दुपारी म्हटले.