औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश करत कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्याचा 61 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली यानंतर जवळा बाजार चौकी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . याप्रकरणी शेख असलम शेख रफिक यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी रात्री साडेअकरा वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला