लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव शिवार येथे दि ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील मयत नामे सिद्धेश्वर गंगाधर वाघमोडे वय ४० वर्षे यांनी सतत दोन दिवस पाऊस होऊन अतिवृष्टी झाल्याने शेतातील पीकांचे नुकसान झाल्यामुळे ताणतणावाखाली राहून शेतातील लिंबाचे झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खबर देणार जयराम वाघमोडे यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी लोहा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कल्लेवार हे आज करीत आहेत.