माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह उपनिरीक्षक धुळे,१७ अंमलदार,२२ गृहरक्षक दलाचे जवान यांच्या वतीने शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी पाचच्या दरम्यान तालुक्यातील मधापुरी येथे पथसंचलन करण्यात आले आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त शांतता व सुव्यवस्था अबाधित होऊ नये यासाठी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नेतृत्वात पथसंचलनातून शक्ती प्रदर्शन केले असून ठाणेदार गणेश नावकार यांच्या एक गाव एक गणपती उपक्रमासाठी केलेल्या आव्हानाला आधीच प्रतिसाद मिळाला आहे.