सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्द्याने वातावरण चांगलेच तापले असून मराठवाडा आणि विदर्भातील 40 गावच्या नागरिकांनी या जलविद्युत प्रकल्पाला विरोध करत एकही इंच जागा या जलविद्युत प्रकल्पाला देणार नाही असा पवित्रा घेत आज रोजी आजरोजी हदगाव तालुक्यातील कामारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत धरण विरोधी शेतकऱ्यांची महा एल्गार सभा दुपारी 12 ते 4 च्या वेळेत संपन्न झाली आहे. यावेळी सदर प्रकल्पाला एकही इंच जागा देणार नाही असा सुर सभेद्वारे निघाला आहे.