फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या सभागृहासाठी सुमारे 15 लक्ष रुपये खर्च केले जाणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती.