कुमठे गायरानामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी झाडे तोडण्यापूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी परत पाठवले. यापुढे गायरान क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू देणार नाही, हे क्षेत्र गावाचे असून असून गावासाठी त्याचा वापर करू दिला जाणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत कुमठे गायरान जमिनीतील गट नंबर ११०९ मध्ये ३२ एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.