महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई येथे आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन आझाद मैदानावर सुरु आहे, कोणतेही युद्ध असो हे उपाशी पोटी लढता येत नाही जाण ठेवत तिथे मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांना मदत व्हावी या हेतूने मुदखेडच्या निवघा येथून काल रात्री 7 च्या सुमारास नांदेड रेल्वे स्टेशन येथून 20 हजार चपाती व सोबत ठेचा देखील पाठवण्यात आला असून दर दोन दिवसांनी हे अन्न पाठवण्यात येणार असल्याचे समजते आहे.