इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रांत चौकात आज मंगळवार दि. 26 ऑगस्ट रात्री सुमारे आठच्या सुमारास क्रमांक MH 12 PN 5313 चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळासाठी वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.वाहनातून अचानक धूर व नंतर आगीच्या ज्वाळा निघू लागल्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वेळीच घटनास्थळी धाव घेतली.