अकोल्याच्या प्रादेशिक वनविभाग अंतर्गत येणाऱ्या पातूर-नंदापूर नियतक्षेत्रात काळवीटाची शिकार करून मांस विक्री करताना आरोपी फुलसिंघ जाधव (रा. कानडी घोंगा) याला रंगेहाथ अटक करण्यात आली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी आरोपीकडून १० किलो काळवीटाचे मांस, शस्त्रे व वाहन जप्त करण्यात आले. तर आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाये.