ऐनपूर या गावात चांगदेव गजानन सुरडकर वय २३ या तरुणाला त्यांच्या मित्रांनी दुचाकी वर बसून गावातील भगवती माता मंदिराजवळ राहणाऱ्या नायट्या पावरा याच्याकडे दारू सोडवण्यासाठी आणले होते. तेथे दारू सोडवण्याचे औषध त्याला पाण्यात दिल्यानंतर त्याला उलट्या झाल्या अस्वस्थ वाटू लागले आणि त्याच्या मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.