महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी मंत्री संजय राठोड यांनी आज दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केली. यावेळी मंत्री राठोड यांनी निलेश जयस्वाल यांच्या कापूस शेतीसोबतच राधा मोहिते, उषा चव्हाण, तिरोना तायकुटे, संगिता जटाये यांच्या नुकसानग्रस्त घराची माहिती घेतली. तसेच परमेश्वर डोंगरे यांच्यासह अनेकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरून अन्न धान्याचे नुकसानीचे पाहणी केली.