भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या विविध मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी सचिन बोपचे, महिला मोर्चा अध्यक्षपदी माहेश्वरी नेवारे, किसान मोर्चा अध्यक्षपदी अविनाश ब्राह्मणकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी दिनेश वासनिक, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी अशोक उईके तर अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी डीम्मु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.