संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या कार मधून दोन लॅपटॉप चोरी गेल्याची घटना २३ जून रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. मुकुंद रमाकांत विचूनकर (६१). रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर हे कुटुंबासह शेगाव येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पार्किंग मध्ये कार उभी केली या दरम्यान उभ्या केलेल्या कारमधून अज्ञात चोरट्याने दोन लॅपटॉप ४५ हजार रुपये किमतीचे लंपास केले.