लातूर -लातूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पुढील काही दिवस विजेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एस.डी.एम.ए.) तसेच स्थानिक प्रशासनाने, घराबाहेर पडणे टाळा, आवश्यक असल्यासच बाहेर पडा, आणि सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असे आवाहन आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.