तुमसर तालुक्यातील मेहगाव येथील आचल विलास पोटभरे वय 18 वर्षे ही दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वाजता दरम्यान तुमसर टाउन येथून स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वरून सायकलने घरी मेहगाव येथे परत जात असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी कार क्र. एमएच 40 बीजी 3731 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे व हयगयीने चालून आचल च्या सायकल ला मागेऊन धडक दिली. यात आचल ही जखमी झाली. दरम्यान अपघाताची माहिती न देता वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.