जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज गावात आठ जणांची टोळी संगनमत करून तंत्रमंत्राच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी गावठाण शिवारात खड्डा खोदत होती. सदर घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोमवार 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 35 वाजता गुप्तधन काढण्यासाठी तंत्रमंत्राच्या आधाराने खड्डा खोदणाऱ्या आठ जणांच्या टोळीला बोरी पोलिसांनी रंगेहात पकडले. महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत बोरी पोलीसात आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल.