पालम तालुक्यातील मौजे खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे हा तरुण शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेतातून घरी परत येते वेळेस लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ पोलीस व पूर्णा आणि गंगाखेड येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून वाहून गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बोटीद्वारे शोध मोहीम सुरू आहे.