खोपोली पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ एका महिन्याच्या आत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ७२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदीचा समावेश आहे.हे गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक घराफोडीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायाल्याने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.