कुर्डुस जिल्हा परिषद गटातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील नवीन देहेनगाव येथे आरोग्य आपल्या दारी या संकल्पनेतून फिरता डिजिटल दवाखान्याद्वारे ७ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून अवघ्या पाच मिनिटांत तपासणी अहवाल नागरिकांच्या हाती देण्यात आला हे या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि ग्रुप ग्रामपंचायत कुसुम्बळेच्या उपसरपंच सौ. रसिकाताई केणी यांमी आयोजन केले होते.